टॉकबॅक चालू केलेले असताना राईडची विनंती कशी करायची ते येथे आहे:
- एकदा टॅप करा, त्यानंतर “कुठे जायचे आहे?” बॉक्सवर दोनदा टॅप करा. अंतिम ठिकाण लिहा किंवा सुचवलेल्या अंतिम ठिकाणांच्या सूचीमधून निवडा.
- तुमचे पिकअप लोकेशन आपोआप तुमचे जीपीएस लोकेशन म्हणून सेट केले जाईल. ते बदलण्यासाठी, तुमच्या पिकअप लोकेशनवर टॅप करा, त्यानंतर तुमचे लोकेशन संपादित करण्यासाठी त्यावर दोनदा टॅप करा.
- तुमच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या वाहन पर्यायांवरून स्वाइप करण्यासाठी दोन बोटे वापरा. एकदा टॅप करा, त्यानंतर त्यापैकी एकाची तुमच्या राईडसाठी निवड करण्याकरता त्यावर दोनदा टॅप करा.
- एकदा टॅप करा, त्यानंतर तुमच्या राईडची विनंती करण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या तळाशी “पिकअपची पुष्टी करा” बटणावर दोनदा टॅप करा
- तुमचा ड्रायव्हर आल्यावर तुम्हाला सूचना मिळेल. मेसेज मोठ्या आवाजात वाचला जाईल.
- एकदा टॅप करा, त्यानंतर खालील पर्याय ॲक्सेस करण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या पट्टीवर दोनदा टॅप करा:
- तुमच्या ड्रायव्हरशी संपर्क साधा - एकदा टॅप करा, त्यानंतर गोल फोन चिन्हावर दोनदा टॅप करून तुमच्या ड्रायव्हरच्या फोन नंबरवर कॉल करा किंवा विनामूल्य कॉल करा
- तुमची राईड रद्द करा - एकदा टॅप करा, नंतर “रद्द करा” बटणावर दोनदा टॅप करा, नंतर एकदा टॅप करा, नंतर पुष्टी करण्यासाठी “होय, रद्द करा” बटणावर दोनदा टॅप करा.
- तुमची स्थिती शेअर करा - एकदा टॅप करा, त्यानंतर “स्थिती शेअर करा” बटणावर दोनदा टॅप करा आणि तुमच्या संपर्कांच्या सूचीतून लोकांना निवडा. तुमची राईड ट्रॅक करण्यासाठी Uber त्या संपर्कांना टेक्स्ट मेसेज पाठवेल.
- भाडे विभाजित करा - एकदा टॅप करा, त्यानंतर “विभाजित भाडे” बटणावर दोनदा टॅप करा आणि संपर्क निवडा