राज्य व फेडरल कायदे मदतनीस प्राण्यांसोबत असणाऱ्या प्रवाशांसह दिव्यांगत्व असलेल्या लोकांशी भेदभाव करण्यास प्रतिबंध करतात. हा प्लॅटफॉर्म वापरणारे ड्रायव्हर्स सर्व लागू कायद्यांचे आणि Uber च्या धोरणांचे पालन करण्यास सहमती दर्शवतात, ज्यात असे म्हटले आहे की ड्रायव्हर्स दिव्यांग रायडर्सना सेवा नाकारू शकत नाहीत किंवा त्यांच्या बाबतीत अन्यप्रकारे भेदभाव करू शकत नाहीत.
बेकायदेशीर भेदभावाची किंवा राईड नाकारण्याची कोणतीही तक्रार आल्यास, त्या घटनेची तपासणी करत असताना आम्ही ड्रायव्हरचे खाते तात्पुरते डीॲक्टिव्हेट करू शकतो.
त्याशिवाय, ड्रायव्हर्सनी वॉकर्स, काठ्या, दुमडणाऱ्या व्हीलचेअर्स किंवा इतर सहाय्यक साधनांचा वापर करणाऱ्या रायडर्सना शक्य तितकी मदत करणे अपेक्षित आहे.