तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासंबंधी नेहमीचे प्रश्न

Uber मला माझे खाते आणि/किंवा ओळख पडताळायला का सांगते? Uber मध्ये, सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. विशिष्ट उत्पादनांच्या वापरकर्त्यांनी त्यांची खाती किंवा त्यांनी आम्हाला रिपोर्ट केलेल्या ओळखींची पडताळणी करणे आम्हाला आवश्यक आहे. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यात आणि इतरांना तुमचे खाते वापरण्यापासून रोखण्यात मदत करण्यासाठी आम्ही हे करतो.

Uber माझी खाते आणि/किंवा ओळख पडताळणी कशी करते? आम्ही तुमची खाते आणि/किंवा ओळख पडताळणी विविध प्रकारे करू शकतो. काही देशांमध्ये, रायडर्सना Uber त्यांचा आयडी क्रमांक प्रदान करण्यास आणि/किंवा त्यांच्या ओळखपत्राचा फोटो घेण्यास सांगते. Uber आयडीची पडताळणी पूर्ण करेल आणि त्या कागदपत्राशी संबंधित इतर कोणतेही खाते नाही हेदेखील तपासेल.

रायडर्सना, Uber त्यांच्या खात्याची पडताळणी करण्यात मदत करण्यासाठी स्वतःचा फोटो घेण्याची परवानगी देऊ शकते. हे सेल्फीज सुरक्षित ठेवले आहेत याची खात्री करण्यासाठी Uber पावले उचलते आणि ते तुमच्या ड्रायव्हरशी कधीही शेअर केले जात नाहीत. आम्ही हे फोटोज काही ठराविक कालावधीनंतर हटवतो सुद्धा.

आम्ही तुमची खाते आणि/किंवा ओळख पडताळणी करू शकत नसल्यास (तुम्ही आवश्यक माहिती सबमिट केली नाही हेही कारण यात समाविष्ट आहे), तुम्ही कॅशमध्ये पेमेंट करणारी काही Uber उत्पादने कदाचित वापरू शकणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या Uber खात्यात पेमेंट पद्धत म्हणून क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अपलोड करावे लागू शकते.

माझी खाते आणि/किंवा ओळख पडताळणी करण्यासाठी Uber तृतीय पक्षांचा वापर करते का? काही प्रकरणांमध्ये, Uber च्या वतीने तृतीय पक्षांद्वारे तुमची खाते किंवा ओळख पडताळणी केली जाऊ शकते. त्या तृतीय पक्षांना तुमची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी करणे किंवा नियमित ऑडिट करणे याशिवाय इतर कोणत्याही हेतूसाठी तुमची माहिती वापरणे, तुमची कागदपत्रे आणि माहिती शेअर करणे किंवा उघड करणे किंवा ती राखून ठेवण्यास कराराने मनाई असून त्यांना Uber च्या वतीने त्यांची सेवा देणे आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त काळ तुमची कागदपत्रे किंवा माहिती ठेवण्याची परवानगी नाही.

Uber माझी वैयक्तिक माहिती ड्रायव्हर्स, डिलिव्हरी व्यक्ती किंवा इतर तृतीय पक्षांसोबत शेअर करते का? Uber च्या काही सेवा आणि वैशिष्ट्यांसाठी आम्ही इतर वापरकर्त्यांसोबत किंवा वापरकर्त्याच्या विनंतीनुसार वैयक्तिक डेटा शेअर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही विनंती करत असलेल्या राईड्स किंवा डिलिव्हरीज करू शकण्यासाठी, आम्ही ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्तीसोबत तुमचे नाव आणि पिक-अप, ड्रॉप-ऑफ किंवा डिलिव्हरी लोकेशनची विनंती शेअर करतो. आम्ही तुमच्या ड्रायव्हरला किंवा डिलिव्हरी व्यक्तीला तुम्ही खाते किंवा ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्याचीदेखील पुष्टी करू शकतो. Uber अन्यथा तुमची माहिती ड्रायव्हर्स किंवा डिलिव्हरी व्यक्तींसोबत शेअर करत नाही.

कायदेशीर कारणास्तव किंवा क्लेम्स किंवा विवादांच्या संदर्भात आम्ही असा डेटा आमचे सहयोगी, सहाय्यक आणि भागीदारांसह देखील शेअर करू शकतो. अधिक माहितीसाठी, कृपया Uber ची गोपनीयता सूचना पहा.

ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींनी त्यांची ओळख पडताळणी करणे Uber ला आवश्यक आहे का? हो, सर्व ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्ती Uber प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी खाते तयार करताना ओळख पडताळणी कागदपत्रे आणि इतर माहिती सबमिट करतात. सबमिट केलेल्या फोटोंशी सेल्फी जुळत असल्याची खात्री करण्यासाठी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींनाही वेळोवेळी सेल्फी घेणे आवश्यक आहे. त्यांची पडताळणी कागदपत्रे कालबाह्य झाली असल्यास त्यांनी नवीन कागदपत्रेदेखील सबमिट करणे आवश्यक आहे.

Uber माझी ओळख पडताळणी करण्यासाठी मी सबमिट केलेल्या माहितीचे संरक्षण कसे करते? Uber तुमचा वैयक्तिक डेटा सुखरूप आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. यात तुम्ही तुमची ओळख आणि/किंवा तुमचे खाते पडताळण्यासाठी सबमिट केलेली कागदपत्रे आणि इतर माहिती एन्क्रिप्ट करणे, असंबंधित हेतूंसाठी त्यांचा वापर प्रतिबंधित करणे आणि आम्ही ज्या हेतूंनी ती संकलित केली आहेत त्यांसाठी आवश्यक कालावधीपर्यंतच, लागू कायद्यानुसार आणि आमच्या गोपनीयता सूचनेशी सुसंगत पद्धतीने, ती जतन करणे समाविष्ट आहे.

माझी ओळख पडताळण्यात मला एखादी समस्या असल्यास मी काय करावे? तुम्हाला तुमची ओळख पडताळण्यात समस्या येत असल्यास किंवा आमच्या सिस्टीमने चूक केली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया Uber सहाय्याशी संपर्क साधा.