व्हॉईसओव्हर वापरून ॲप मेनूवर नेव्हिगेट करण्यासाठी तुमचे ॲप उघडा आणि मेनू उघडण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या वर डावीकडे दोनदा टॅप करा. खालील पर्याय वरून खालपर्यंत दिसतात:
तुमच्या ट्रिप्स - या विभागामध्ये तुमच्या मागील राइड्स सूचीबद्ध केलेल्या असतात किंवा तुम्ही आगामी, शेड्युल केलेल्या राइड्स पाहू शकता. तुमच्या राइड इतिहासावरून स्वाइप करण्यासाठी तीन बोटे वापरा. ट्रिपसंबंधी मदतीसाठी, अभिप्राय नोंदवण्यासाठी किंवा ट्रिपची पावती पाहण्यासाठी त्यातील एक ट्रिप निवडा.
वॉलेट - या विभागामध्ये तुम्ही पेमेंट पद्धत जोडू किंवा अपडेट करू शकता
मदत - तुमच्या प्रश्नांची उत्तरे लेखांमध्ये शोधा. तुम्ही या विभागातील ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांबद्दल देखील प्रतिसाद सादर करू शकता.
मोफत राईड्स - इतरांना ॲप वापरण्यास आमंत्रित करण्याकरता या विभागामध्ये स्टोअर केलेला वैयक्तिक आमंत्रण कोड वापरा
सेटिंग्ज - ट्रिपपूर्वी किंवा त्यादरम्यान तुमचे स्थान त्वरित शेअर करण्यासाठी तुमची संपर्क माहिती अपडेट करा, घर किंवा ऑफिस यासारखी पसंतीची स्थाने सेट करा किंवा संपर्क जोडा
सहाय्याशी संपर्क साधा
तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी संबंधित प्रश्न असतील किंवा तुमची मते नोंदवायची असल्यास तुम्ही मेनूच्या "मदत” विभागामध्ये "ॲक्सेसिबिलिटी" वर टॅप करून आमच्याशी संपर्क साधू शकता. मेनूच्या "तुमच्या ट्रिप्स" विभागांमधून विशिष्ट ट्रिप निवडून ट्रिप संबंधित कोणत्याही इतर समस्येचा अहवाल द्या. तुमची एखादी समस्या मांडण्यासाठी तुम्ही पुढील स्क्रीनमधून विविध पर्यायांमधून निवड करू शकता.