माझे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी मी काय करू शकतो?

2-पायरी पडताळणी चालू करा

जेव्हा 2-पायरी पडताळणी चालू असते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या Uber खात्यात साइन इन करता तेव्हा तुम्हाला दोन सुरक्षा आव्हानांना सामोरे जावे लागेल.

पडताळणी कोड मिळवण्याचे 2 मार्ग आहेत:

  1. Uber कडील मजकूर संदेशांद्वारे.
  2. कोड्स जनरेट करण्यासाठी Duo, Authy किंवा Google Authenticator सारखे सुरक्षा अ‍ॅप डाउनलोड करा.

तुम्ही 2-पायरी पडताळणी चालू केलेली नसेल तरीही तुमच्या खात्याचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी Uber ला काहीवेळा या अतिरिक्त पडताळणीची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या खात्यातील काही तपशील बदलल्यास, ते बदल तुम्हीच करत आहात याची पडताळणी करण्यासाठी Uber तुम्हाला अतिरिक्त माहिती विचारेल.

फिशिंग स्कॅम्सपासून सावध रहा

फिशिंग म्हणजे तुमच्याकडून तुमची Uber खाते माहिती (ईमेल, फोन नंबर किंवा पासवर्ड) चलाखीने काढून घेण्याचा प्रयत्न होय. फिशिंग स्कॅम्स अनेकदा अनाहूत ईमेल्स किंवा एसएमएस मेसेजेस वापरतात ज्यात लिंक किंवा ॲटॅचमेंट असते जी तुम्हाला बनावट लॉगिन पृष्ठावर घेऊन जातात. Uber कर्मचारी कधीही ईमेल किंवा फोनद्वारे तुमचा पासवर्ड किंवा आर्थिक माहिती तसेच तुमच्या खात्याच्या कोणत्याही माहितीची विनंती करणार नाहीत. तुम्हाला Uber कडून असल्याचा दावा करणारा आणि तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्यास सांगणारा किंवा https://www.uber.com वरून नसलेल्या वेबसाइटवर जाण्यास सांगणारा मेसेज मिळाल्यास, त्या लिंकवर क्लिक करू नका आणि प्रतिसाद म्हणून कोणतीही माहिती देऊ नका. कृपया त्या मेसेजबद्दल Uber ला त्वरित रिपोर्ट करा जेणेकरून आमचे तज्ज्ञ तपास करू शकतील.

कठीण आणि युनिक पासवर्ड्स वापरा

तुमच्या Uber खात्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट करणे म्हणजे एक असा युनिक पासवर्ड वापरणे जो तुम्ही इतर कोणत्याही सेवेसाठी वापरत नाही. तुमच्या पासवर्डमध्ये लोअरकेस आणि अप्परकेस अक्षरे, संख्या आणि किमान एक चिन्ह यासह किमान 10 वर्ण आहेत याची खात्री करा.

तुम्ही पासवर्ड मॅनेजर वापरण्याचाही विचार करू शकता, जो तुमच्या प्रत्येक ऑनलाइन खात्यासाठी मजबूत आणि युनिक पासवर्ड सहजपणे तयार करू शकतो, संग्रहित करू शकतो आणि अपडेट करू शकतो.