तुम्ही मेनूमधून "पेमेंट" निवडून तुमची Uber क्रेडिट शिल्लक पाहू शकता. क्रेडिट ज्या चलनात जारी केले आहे त्या चलनातच तुमची शिल्लक क्रेडिट रक्कम दाखवली जाते. कृपया लक्षात घ्या की Uber क्रेडिट एका चलनातून दुसऱ्या चलनामध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाही.
Uber क्रेडिट तुमच्या पुढच्या ट्रिपवर आपोआप डिफॉल्टनुसार लागू होईल. ट्रिपच्या आधी किंवा दरम्यान, तुम्ही तुमच्या पसंतीची पेमेंट पद्धत निवडू शकता आणि तुमचे Uber क्रेडिट टॉगल करून चालू किंवा बंद करू शकता.
ट्रिप संपल्यावर, तुमच्या निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर शुल्क आकारले जाते. Uber क्रेडिट टॉगल करून बंद केले असल्यास, तुमच्या डिफॉल्ट पेमेंट खात्यावर संपूर्ण भाडे आकारले जाईल. Uber क्रेडिट टॉगल करून चालू केले असल्यास परंतु तुमच्या ट्रिपच्या भाड्यापेक्षा कमी असल्यास, बाकीचे भाडे तुमच्या पेमेंट खात्यावर आकारले जाते.
तुमच्याकडे तुमच्या खात्यावर विनामूल्य राईड असल्यास, ती आपोआपच तुमची पुढची ट्रिप असेल. विनामूल्य राईड्स टॉगल करून बंद करणे शक्य नाही.