तुम्ही Uber प्लॅटफॉर्म कसे वापरता यावर अवलंबून तुमच्या डेटा डाउनलोडच्या सामग्रीमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असू शकतात:
तुमच्या खाते डेटामध्ये अशा प्रकारची माहिती समाविष्ट असेल:
तुमच्या रायडर डेटामध्ये तुम्हाला तुमच्या अंतिम ठिकाणावर नेण्यासाठी वापरलेली माहिती समाविष्ट असते, जसे की:
तुमच्या Uber Eats डेटामध्ये ऑर्डर इतिहासाचे तपशील दिलेले असतात, जसे की:
आमच्या गोपनीयता सूचना मधील "डेटा संकलन आणि वापर" विभागात अधिक जाणून घ्या.
काही माहिती तुमच्या डेटा डाउनलोडमध्ये वाजवी कारणांसाठी समाविष्ट केलेली नसते. हे सुरक्षिततेच्या कारणांसाठी किंवा माहितीवरील मालकी हक्कामुळे असू शकते. आम्ही वाजवी कारणांकरता वगळू शकत नाही अशी दुसऱ्या पक्षाचा वैयक्तिक डेटा असलेली माहिती देखील आम्ही समाविष्ट करत नाही. उदाहरणार्थ, सहाय्य तिकिटांमधील मजकूर, Uber सोबत झालेली ईमेलची देवाण-घेवाण किंवा तुम्हाला मिळालेले मेसेजेस आम्ही समाविष्ट करत नाही.
खाली प्रत्येक खाते प्रकारासाठी, डाउनलोडमध्ये समाविष्ट करण्यात न येणाऱ्या माहितीचा प्रकार, तसेच ती समाविष्ट न करण्याची कारणे यांची यादी दिलेली आहे.
सामाजिक सुरक्षा क्रमांक, पत्रव्यवहाराचा पत्ता तसेच बँक खाते आणि क्रेडिट कार्ड तपशील यासारखा तुम्ही आम्हाला दिलेला अत्यंत वैयक्तिक स्वरूपातील डेटा तुमच्या डाउनलोडमध्ये समाविष्ट केला जात नाही. तुमच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आम्ही हा डेटा वगळतो. तुम्हाला केवळ तुम्ही पाठवलेले मेसेजेस मिळतील. सुरक्षिततेच्या कारणास्तव, तुम्हाला मिळालेले मेसेजेस समाविष्ट केले जात नाहीत.
तुमच्या डाउनलोडचा आकार कमी करण्यासाठी आणि आम्हाला तुमचा डेटा शक्य तितक्या लवकर मिळवून देता यावा यासाठी तुमच्या एक्सपोर्टमध्ये समाविष्ट केलेला डिव्हाइस ओएस, डिव्हाइसचे मॉडेल, डिव्हाइसची भाषा आणि ॲप आवृत्ती यासारखा मोबाइल इव्हेंट डेटा मागील 30 दिवसांपुरता मर्यादित असतो.
तुमच्या डाउनलोडमध्ये तुमच्या ड्रायव्हरच्या अनुभवाबद्दलची माहिती खूपच मर्यादित प्रमाणात असू शकते. तुम्ही ड्रायव्हर डॅशबोर्ड मध्ये तुमच्या ड्रायव्हरचा आणखी डेटा आणि माहिती पाहू शकता.
तुमच्या डेटा डाउनलोडमध्ये तुम्ही Uber प्लॅटफॉर्म कसा वापरता त्याबद्दलच्या सर्वात संबंधित डेटाचा समावेश असतो. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक डेटाबद्दल प्रश्न असल्यास, तुमच्या डाउनलोडमध्ये उपलब्ध नसलेला विशिष्ट डेटा मिळवण्याची इच्छा असल्यास, तुम्हाला तुमच्या डेटामध्ये दुरुस्ती करण्याची विनंती करायची असल्यास किंवा अन्य कारणास्तव Uber च्या डेटा संरक्षण अधिकाऱ्याशी (डीपीओ) संपर्क साधण्याची तुम्हाला इच्छा असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या लिंकमार्फत विनंती सादर करू शकता.