माझा डिलिव्हरी पत्ता बदला

तुमच्या ऑर्डरवरील डिलिव्हरीचा पत्ता चुकीचा असल्यास, तुमच्या डिलिव्हरी व्यक्तीला तसे कळवण्यासाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधा.

ऑर्डर योग्य पत्त्यावर डिलिव्हर करायची की नाही हे तुमची डिलिव्हरी व्यक्ती ठरवू शकते. त्यांना प्रवासाच्या अतिरिक्त अंतरासाठी पैसे दिले जातील.

डिलिव्हरी व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी:

  1. तुमची ऑर्डर एखाद्या डिलिव्हरी व्यक्तीला असाइन केली जाताच, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचे Uber Eats ॲप वापरा.
  2. ऑर्डर ट्रॅकिंग स्क्रीनच्या नकाशामध्ये “संपर्क करा” वर टॅप करा.
  3. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कॉल किंवा मेसेज यापैकी एक निवडा.
    • डिलिव्हरी व्यक्तीला कॉल केल्यास, त्यांना स्पष्ट सूचना देण्याची काळजी घ्या.
    • डिलिव्हरीमध्ये आणखी विलंब टाळण्यासाठी तुमचा फोन जवळ ठेवा आणि आवाज चालू ठेवा.