माझी ऑर्डर अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे

जेव्हा तुम्ही तुमच्या कार्टमध्ये आयटम्स जोडत असता आणि ऑर्डर देत असता, तेव्हा तुमचे ॲप प्रत्येक व्यापाऱ्यासाठी कालावधीचा अंदाज दाखवते. याद्वारे व्यापाऱ्याकडून तुमच्या पत्त्यावर खाद्यपदार्थ पोहोचण्यासाठी तुम्ही‍ किती वेळ प्रतीक्षा गृहीत धरावी याचा अंदाज वर्तवला जातो. या अंदाजामध्ये खाद्यपदार्थ बनविणे, पिकअप करणे आणि तुम्हाला डिलिव्हरी देण्यासाठी लागणारा कालावधी समाविष्ट आहे.

व्यापारी आणि डिलिव्हरी भागीदार अंदाजे डिलिव्हरी वेळेत खाद्यपदार्थ डिलिव्हर करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करतात. कृपया लक्षात घ्या की प्रत्यक्ष डिलिव्हरी वेळ कमी-अधिक होऊ शकतो. कारणीभूत घटकांमध्ये व्यापारी किती व्यस्त आहे, तुमच्या ऑर्डरचा आकार (मोठी ऑर्डर बनविण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो), रहदारीची परिस्थिती आणि इतर बाह्य घटक यांचा समावेश होतो.

जर तुमची ऑर्डर निघाली असेल, तर तुम्ही ऑर्डरच्या स्थितीबद्दल चौकशी करण्यासाठी तुमच्या डिलिव्हरी भागीदाराशी थेट संपर्क साधू शकता.

तुमच्या डिलिव्हरी भागीदाराशी संपर्क कसा साधावा:

1. मॅपजवळील संपर्कावर टॅप करा
2. कॉल किंवा टेक्स्ट मेसेज यांपैकी निवडा