बिझनेस प्रोफाइल्सद्वारे तुम्ही तुमच्या बिझनेस क्रेडिट कार्डवरूनऑर्डर्सचे शुल्क देऊ शकता आणि तुमच्या कार्यालयाच्या ईमेल पत्त्यावर पावत्या प्राप्त करू शकता. तुम्ही तुमच्या कंपनीच्या बिझनेस खात्यात सामील होऊ शकता, तसेच स्वतःहून बिझनेस प्रोफाइलदेखील तयार करू शकता.
बिझनेस प्रोफाइल तयार करण्यासाठी:
1. Uber Eats ॲप उघडा.
2. तळाशी उजव्या कोपऱ्यात खाते चिन्हावर जा.
3. दिसत असलेल्या यादीमध्ये बिझनेस प्राधान्ये निवडा.
4. 'चालू करा' वर टॅप करा.
5. तुमच्या पसंतीच्या खात्याचा प्रकार निवडा. तुम्ही वैयक्तिक खाते तयार करणे, टीमचे खाते तयार करणे आणि सध्या असलेल्या खात्यात सामील होणे यापैकी एक पर्याय निवडू शकता.
तुम्हाला ज्या ऑर्डरचे शुल्क तुमच्या बिझनेस क्रेडिट कार्डावर लावायचे आहे अशा कोणत्याही ऑर्डरच्या चेकआऊटच्या आधी किंवा दरम्यान तुम्ही तुमची बिझनेस प्रोफाइल निवडणे आवश्यक आहे. प्रोफाइल्स स्विच करण्यासाठी, खालील लेखातील सूचनांनुसार कृती करा.
तुमच्या कंपनीच्या बिझनेस खात्यात सामील होण्यासाठी, सूचनांकरता खालील लिंकवर टॅप करा.