तुमच्या Uber डेटाच्या प्रतीची विनंती करा

Uber मध्ये, आमच्यासाठी तुमचा विश्वास मोलाचा आहे आणि आम्ही कोणता डेटा गोळा करतो तसेच त्याचा कसा वापर करतो हे समजून घेण्यात तुमची मदत करू इच्छितो. Uber वैयक्तिक डेटा कसा गोळा करते आणि वापरते याविषयी तपशीलवार माहितीसाठी तुम्ही Uber ची गोपनीयता रूपरेषा किंवा गोपनीयता सूचना पाहू शकता.

तुम्ही Uber वापरता तेव्हा कोणती माहिती गोळा आणि शेअर केली जाते हे पाहण्यासाठी व याबाबतचे पर्याय निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला पर्यायही देतो. हा डेटा एक्सेस करण्यासाठी, तुम्हाला जास्तीचा सुरक्षा उपाय म्हणून 2-पायरी पडताळणी वापरून तुमच्या खात्यात साइन इन करावे लागेल.

तुमचा डेटा एक्सप्लोर करा

तुमच्या खात्याबद्दलच्या माहितीचा सारांश पहा आणि सविस्तर माहिती घ्या, जसे की किती ट्रिप्स घेतल्या ती संख्या आणि Uber Eats ऑर्डर्स.

तुमचा डेटा डाउनलोड करा

या पर्यायासह, तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डेटा फाइलची विनंती करू शकता. आम्हाला तुमची विनंती मिळाल्यावर आणि फाइल डाउनलोड करण्यासाठी तयार असेल तेव्हा पुन्हा आम्ही तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे एक सूचना पाठवू.

तुमचे खाते हटवा

तुमचा डेटा डाउनलोड केल्याने तो डेटा किंवा तुमचे खाते Uber च्या सिस्टिममधून हटवले जात नाही. तुम्हाला तुमचे खाते हटवायचे असल्यास कृपया खालील लिंकचा वापर करा.