रेस्टॉरंट स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ वापरण्याबद्दल नेहमीचे प्रश्न

माझी ऑर्डर व्यापाऱ्याचा डिलिव्हरी स्टाफ का वापरत आहे?

आम्ही आमच्या ग्राहकांना व्यापाऱ्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देऊ इच्छितो. काही व्यापार्‍यांचा स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ असतो आणि ते ॲपद्वारे डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीऐवजी त्यांच्या स्वतःच्या स्टाफच्या मार्फत तुमची ऑर्डर पूर्ण करणे निवडतात.

त्यामुळे डिलिव्हरीचा अनुभव कसा बदलतो?

व्यापाऱ्याच्या‍ डिलिव्हरी स्टाफने डिलिव्हर केलेल्या ऑर्डर्ससाठी, तुम्ही ॲपमध्ये डिलिव्ह‍री स्टाफचे लोकेशन फॉलो करू शकत नाही. एकदा व्यापाऱ्याने तुमची ऑर्डर स्वीकारल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरबाबत मदत हवी असल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.

*व्यापारी आणि त्यांच्या डिलिव्हरी कर्मचार्‍यांना डिलिव्हरी पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी तुमचे नाव, फोन नंबर, पत्ता आणि कोणत्याही विशेष सूचना देखील मिळतात. व्यापाऱ्याचा डिलिव्हरी स्टाफ ॲपच्या स्टँडर्ड साइन-अप आणि तपासणी प्रक्रियेच्या अधीन नाही. व्यापारी त्यांच्या मार्केटमधील व्यावसायिकदृष्ट्या वाजवी प्रक्रिया वापरून त्यांच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची योग्यरित्या तपासणी करण्यासाठी जबाबदार असतात. यात जेथे उपलब्ध असेल तेथे, पार्श्वभूमी तपासणी किंवा इतर स्क्रीनिंग पद्धतींचा समावेश आहे. *

मी व्यापाऱ्याच्या डिलिव्हरी स्टाफशी संपर्क साधू शकतो का?

नाही, व्यापारी त्यांचा स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ वापरतात तेव्हा तुम्ही डिलिव्हरी व्यक्तीशी संपर्क साधू शकत नाही. त्याऐवजी, थेट व्यापाऱ्याला कॉल करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. ते तुमच्या वतीने त्यांच्या डिलिव्हरी स्टाफशी संपर्क साधू शकतात.

एखादा व्यापारी स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ वापरतो हे कसे ओळखावे

तुम्ही ॲपमध्ये अनेक ठिकाणी हे तपासू शकता:

  • व्यापारी फीडमध्ये, तुम्हाला व्यापाऱ्याच्या नावाखाली एक चिन्ह दिसेल जे सूचित करते की ते त्यांचा स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ वापरतात
  • व्यापाऱ्याच्या मेनूमध्ये, ते‍ ‍त्यांचा स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ वापरत असल्यास, तुम्हाला पृष्‍ठाच्या शीर्षस्थानी एक सूचना दिसेल
  • तुम्ही ऑर्डर देण्यापूर्वी, तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी एक चिन्ह दिसेल जे ते त्यांचा स्वतःचा डिलिव्हरी स्टाफ वापरतात किंवा नाही हे सूचित करते