बिझनेस ग्रुप ऑर्डर कशी द्यायची

तुम्ही ग्रुप ऑर्डरची सरूवात केल्यावर, तुम्हाला एक शेअर करता येणारी लिंक मिळेल जिच्यामुळे अनेक लोकांना एकाच बिझनेस ग्रुप ऑर्डरमध्ये आयटम्स जोडता येतील. तुम्ही यापैकी एक करू शकता:

  • सर्वांसाठी पेमेंट करणे
  • प्रत्येक गेस्टला त्यांच्या स्वतःच्या हिश्शाचे पैसे द्यायला लावणे

बिझनेस ग्रुप ऑर्डर करण्यासाठी तुम्ही बिझनेस प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. बिझनेस प्रोफाइलशिवाय, तुम्ही तुमच्या संस्थेच्या पेमेंट पद्धतीवरुन मीलचे बिल देऊ शकणार नाही.

बिझनेस ग्रुप ऑर्डर कशी करायची:

  1. Uber Eats ॲपमध्ये साइन इन करा किंवा ubereats.com वर जा.
  2. तुमची बिझनेस प्रोफाइल निवडा, त्यानंतर तुम्ही ज्या व्यापाऱ्याकडून ऑर्डर करू इच्छिता तो शोधा.
  3. "ग्रुप ऑर्डर" निवडा.
  4. तुम्हाला हवे असल्यास, डिलिव्हरीचा पत्ता किंवा खर्च मर्यादा या सारखे ग्रुप ऑर्डरचे तपशील संपादित करा. तुम्ही सर्वांसाठी पैसे देणे किंवा बिल विभाजित करणेदेखील निवडू शकता.
  5. “गेस्ट्स आमंत्रित करा” निवडा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या ग्रुपमधील प्रत्येकाला पाठवण्यासाठी एक लिंक मिळेल.
  6. तुम्ही ऑर्डरमध्ये सहभागी होत असल्यास तुमचे स्वतःचे आयटम्स जोडा.
  7. प्रत्येकाने त्यांचे आयटम्स जोडल्यानंतर, “ऑर्डर पहा” आणि “चेकआउटवर जा” निवडा.
  8. ग्रुप ऑर्डर तयार असल्यास, “ऑर्डर लॉक करा आणि सुरू ठेवा” निवडा. ती लॉक केल्यावर, गेस्ट्स आयटम्स संपादित करू किंवा जोडू शकणार नाहीत. ती तयार नसल्यास, “मागे जा” निवडा.
  9. ऑर्डर तपशीलांचा पुन्हा आढावा घ्या आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.
  10. “ग्रुप ऑर्डर करा” निवडा.