प्रोमो कोड लागू झाला नाही

सध्या सुरू असलेल्या ऑर्डरवर प्रोमो कोड लागू केला गेला होता याची तुम्हाला खात्री नसल्यास, कृपया ऑर्डर पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा.

ऑर्डर पूर्ण झाल्यावर, तुम्ही ॲपमध्ये हे तपासू शकता:

  1. मुख्य स्क्रीनच्या तळाशी मेनू बारवरील प्रोफाइल चिन्हावर टॅप करा (सर्वात दूर उजवीकडील चिन्ह).
  2. “प्रमोशन्स” वर टॅप करा.
    • ॲक्टिव्ह प्रमोशन्स पृष्ठाच्या सर्वात वर दिसतात आणि त्यामध्ये कालबाह्यता तारीख, ती वापरली जाऊ शकते असे लोकेशन आणि इतर तपशील दाखवले जातात.
    • रिडीम केलेले आणि कालबाह्य झालेले प्रोमोज “मागील प्रमोशन्स” विभागात दिसतात, संबंधित ऑर्डरची पावती पाहण्यासाठी “पावती पहा” वर फक्त टॅप करा.

प्रोमो कोड फक्त एकदाच वापरले जाऊ शकतात. एकाच प्रमोशनवरील कोणतेही उरलेले क्रेडिट भविष्यातील ऑर्डर्सवर लागू होत नाही. तसेच, हे लक्षात ठेवा की प्रत्येक प्रोमो कोडचे स्वतःचे नियम आणि अटी असतात: तुम्ही तो लागू असलेल्या ठिकाणी, चलनात आणि कालबाह्यतेच्या तारखेपूर्वी वापरत असल्याची खात्री करा.

प्रोमो कोड्स कसे काम करतात याबद्दल अधिक माहितीसाठी, हा लेख पहा.

तुम्हाला अजूनही प्रोमो कोडबाबत समस्या येत असल्यास, आम्हाला कळवा.