ड्रायव्हरला रेटिंग देणे

आम्ही रेटिंग्ज गांभीर्याने घेतो कारण त्यांच्यामुळे आम्हाला रायडर्स आणि ड्रायव्हर्स ह्या दोघांसाठीही एक सकारात्मक अनुभव सुनिश्चित करता येतो. कमी रेटिंग्ज असलेले ड्रायव्हर्स ॲपचा ॲक्सेस गमावू शकतात.

ड्रायव्हरला रेटिंग देण्यासाठी, ट्रिपच्या शेवटी अ‍ॅपमधील सूचनांचे पालन करा. तुम्हाला ईमेल केलेल्या पावतीच्या तळाशी तुम्हाला ड्रायव्हरला रेटिंग देण्यासदेखील सांगितले जाईल.

ट्रिप चालू असतानादेखील तुम्ही ड्रायव्हरला रेटिंग देऊ शकाल (तुमच्या लोकेशनवर अवलंबून):

  1. ॲप उघडा.
  2. मुख्य स्क्रीनवर, ट्रिपचे तपशील विस्तारण्यासाठी पांढऱ्या स्क्रीनवर टॅप करा.
  3. “तुमची राईड कशी चालली आहे?” च्या शेजारीे “रेटिंग द्या किंवा टिप द्या” वर टॅप करा
  4. तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला रेटिंग देण्यासाठी स्टार्सची संख्या (1-5) निवडा.
  5. तुम्हाला हवे असल्यास एक टिप जोडा आणि "सेव्ह करा" निवडा.

तुम्ही ड्रायव्हरला खालील रेटिंग दिल्यास:

  • 5 स्टार्स, त्यांची प्रशंसा करण्याचा पर्याय दिसेल. ट्रिप दरम्यान कोणतीही विशिष्ट समस्या नसल्यास बहुतेक रायडर्स 5-स्टार रेटिंग देतात.
  • 5 स्टार्स पेक्षा कमी, तुम्हाला नेहमी येणाऱ्या समस्यांच्या सूचीमधून ट्रिप किंवा ड्रायव्हरबद्दल विशिष्ट अभिप्राय देण्यास सूचित केले जाईल. 1-स्टार रेटिंगचा सामान्यतः अर्थ असा होतो की ड्रायव्हरबाबत एखादी गंभीर समस्या होती.

ट्रिपची किंमत, अ‍ॅपच्या समस्या किंवा पूल करताना गैरसोयीची जुळवणी यांसारख्या समस्या या ड्रायव्हरच्या चुका नसतात, त्यामुळे या त्यांच्या एकूण रेटिंगमध्ये मोजल्या जाणार नाहीत.

तुम्ही ट्रिपनंतर 30 दिवसांच्या आत ड्रायव्हरला रेटिंग देऊ शकता. तुम्ही दिलेले रेटिंग ड्रायव्हरला कधीही पाहता येत नाही.