मी माझे खाते मित्रमैत्रिणी किंवा कौटुंबिक सदस्यांसोबत शेअर करू शकतो?

Uber च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे खाते शेअर करणे प्रतिबंधित आहे आणि तुमचे खाते दुसऱ्या व्यक्तीने वापरले असावे असे सूचित करणाऱ्या गंभीर किंवा वारंवार अहवालांमुळे ॲपचा ॲक्सेस गमावला जाऊ शकतो.

या स्वरूपाच्या पुष्टी झालेल्या तक्रारी आम्ही अजिबात सहन करत नाही. ज्या रायडरने या धोरणाचे उल्लंघन केले असेल त्यांना प्लॅटफॉर्मवरून कायमचे काढून टाकण्यात येईल. एखादी पुष्टी न झालेली तक्रार आल्यास, रायडना औपचारिक ताकीद मिळेल. पुष्टी न झालेल्या तक्रारी एका स्ट्राइक सिस्टीममार्फत नोंदवण्यात येतात. खाते शेअर करण्याच्या अनेक तक्रारी आल्यास रायडरचे खाते बंद होऊ शकते.

रायडर्सनी खाती शेअर करू नयेत असे असले तरी, तुम्ही दुसर्‍या रायडरसाठी ॲपमधून राईडची विनंती करू शकता:

तुम्हाला काही अतिरिक्त प्रश्न असल्यास, कृपया आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा घ्या.