Uber कनेक्टद्वारे पाठवलेल्या आयटम्ससाठी सर्व कायद्यांचे आणि नियमांचे तसेच Uber धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे. बेकायदेशीर, असुरक्षित किंवा या पृष्ठावर सूचीबद्ध केलेले इतर प्रतिबंधित आयटम्स पाठवण्यास सक्त मनाई आहे.
तुम्ही या पृष्ठावर सूचीबद्ध केलेल्या आयटम्ससह, कायद्याचे किंवा आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा एखादा आयटम पाठवला तर, आम्ही तुमचे खाते ताबडतोब स्थगित करणे किंवा रद्द करणे, यासह परंतु त्यापुरती मर्यादित नसलेली, योग्य ती सुधारात्मक कारवाई करू. बेकायदेशीर किंवा असुरक्षित उत्पादने पाठवल्यास दिवाणी आणि फौजदारी दंडासह कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते.
Uber तुम्हाला आमच्याशी संपर्क साधून Uber धोरणांचे किंवा लागू कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आयटम्सची तक्रार करण्यास प्रोत्साहित करते. आम्ही प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू.
खालील आयटम्स पॅकेज डिलिव्हरीमधून प्रतिबंधित आहेत:
- लोक
- बेकायदेशीर आयटम्स
- बंदुका, शस्त्रे, दारूगोळा आणि त्यांचे भाग
- अल्कोहोल
- अत्यंत नाशवंत अन्न किंवा पेये (उदा. कच्चे मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ इ.)
- फार्मास्युटिकल उत्पादने, प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी औषधे, जीवनसत्त्वे किंवा पूरके
- पैसे, गिफ्ट कार्ड्स, लॉटरी तिकिटे किंवा ट्रान्सफर करता येणाऱ्या सिक्युरिटीज
- मादक पदार्थ, ड्रग्जचे साहित्य किंवा तंबाखू उत्पादने
- धोकादायक किंवा घातक आयटम्स, ज्यामध्ये समाविष्ट आहे:
- स्फोटके
- विषारी किंवा ज्वलनशील आयटम्स (ज्वलनशील द्रव असलेले पेंट्स किंवा अधेसिव्ह्ज)
- 49 सीएफआर कलम 172.101 मधील घातक पदार्थांच्या तक्त्यामध्ये ओळखले गेलेले पदार्थ आणि सामग्री किंवा 49 यू.एस.सी. कलम 5103 आणि त्यानंतरच्या कलमांनुसार धोकादायक ठरवण्यात आलेली आणि 49 सीएफआर, सबटायटल बी, चॅप्टर I, सबचॅप्टर सी मध्ये नमूद केलेल्या नियमनांनुसार फलक लावणे आवश्यक असेल इतक्या मोठ्या प्रमाणात वाहून नेण्यात येणारी सामग्री, घातक कचरा (हायपोडर्मिक सुयांसह परंतु त्यापुरते मर्यादित नाही) किंवा वैद्यकीय कचरा
- चोरीच्या वस्तू
- नाजूक आयटम्स
- लैंगिक सहाय्यक सामग्री; अश्लील किंवा पॉर्नोग्राफिक सामग्री
- पशुधन, नियंत्रित प्रजाती (उदा. हानिकारक तण, प्रतिबंधित बिया), किंवा प्राण्यांचे अवयव, रक्त किंवा द्रव
- तुम्हाला पाठवण्याची परवानगी नसलेले कोणतेही आयटम्स
- असे आयटम्स जे प्राप्तकर्त्याला वाजवीपणे धमकावणारे किंवा त्रासदायक वाटतील किंवा अन्यथाही समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतील
प्रतिबंधित आयटम्सची वरील यादी संपूर्ण नाही. वरील सूचीमध्ये नसलेल्या अतिरिक्त आयटम्सना प्रतिबंधित करण्याचा विवेकाधिकार Uber राखून ठेवते.