माझ्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने राईड बुक केली

मी बुक न केलेल्या राईडसाठी मला सूचना का मिळाली?

तुमची Uber सह असलेली राईड वाटेत असल्याचे सांगणारा मेसेज तुम्हाला आल्यास, कोणीतरी तुमच्यासाठी राईड शेड्युल केलेली असू शकते. तुमचे पिकअप तपशील पाहण्यासाठी मेसेजमधील सूचनांचे पालन करा.

इतर लोक विनंती करू शकतील असे राईड्सचे प्रकार

तुमच्यासाठी तीन प्रकारच्या ट्रिप्सची विनंती केली जाऊ शकते:

  • Uber for Business संस्थेने विनंती केलेल्या राईड्स
  • सार्वजनिक ट्रांझिट संस्थांनी विनंती केलेल्या राईड्स
  • मित्र-मैत्रिणींनी किंवा कुटुंबीयांनी बुक केलेल्या राईड्स

Uber for Business संस्थेने विनंती केलेल्या राईड्स

एखादी Uber for Business संस्था तुमच्यासाठी राईडची विनंती करते, तेव्हा तुम्हाला खालीलपैकी एक मिळेल:

  • तुमच्या मोबाइल फोनवर एक मेसेज
  • तुमच्या मोबाइल किंवा लँडलाईन फोन नंबरवर एक स्वयंचलित कॉल
  • Uber ॲप सूचना

सार्वजनिक ट्रांझिट संस्थांनी विनंती केलेल्या राईड्स

सार्वजनिक ट्रांझिट संस्था तुमच्यासाठी शटल, UberX किंवा Uber Pool बुक करू शकतात. Uber ॲप प्रत्यक्ष त्या वेळेची ट्रांझिट माहिती देते.

ट्रांझिटबद्दलची माहिती, भाडी, मार्ग आणि शेड्युल्स तृतीय पक्षाद्वारे दिली जातात आणि Uber त्यांच्या अचूकतेची हमी देऊ शकत नाही.

मित्र-मैत्रिणींनी किंवा कुटुंबीयांनी बुक केलेल्या राईड्स

तुम्ही वेगळ्या लोकेशनवर असलात तरीही एखादे मित्र-मैत्रीण किंवा कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी राईडची विनंती करू शकतात.

तुमच्याकडे Uber खाते नसल्यास तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरच्या आणि वाहनाच्या माहितीसह तुमच्या ट्रिपच्या सूचना असलेला एक मेसेज मिळेल.

तुमच्याकडे Uber खाते असल्यास, तुम्हाला खालील माहिती असलेली एक ॲप सूचना मिळेल:

  • ड्रायव्हरचे तपशील
  • वाहनाचे तपशील
  • तुमच्या राईडसाठी प्रत्यक्ष त्या वेळेचे ट्रॅकिंग

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी राईडची विनंती कशी करावी याबद्दल अधिक माहितीसाठी, हा लेख पहा.

माझ्यासाठी विनंती केलेली एखादी ट्रिप मी रद्द किंवा संपादित करू शकतो का?

तुम्हाला तुमची ट्रिप रद्द किंवा संपादित करायची असल्यास ज्या व्यक्तीने तुमच्या राईडची विनंती केली आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क साधा.

माझ्या राईडबद्दल सुरक्षिततेचा एखादा मुद्दा मी कसा रिपोर्ट करू?

ड्रायव्हर्स Uber प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी साइन अप करतात तेव्हा ते समुदाय मार्गदर्शक तत्त्वांना सहमती देतात, ज्यानुसार अव्यावसायिक वर्तन, अयोग्य शारीरिक संपर्क किंवा शाब्दिक हल्ला प्रतिबंधित आहे.

ड्रायव्हर्स नेहमीच वाहने सुरक्षितपणे चालवण्यासही सहमती देतात. तुमच्या ट्रिपदरम्यान असुरक्षित वाटल्याचा कोणताही अनुभव तुम्हाला आला असल्यास कृपया आम्हाला कळवण्यासाठी खालीलपैकी एखादा मुद्दा निवडा.

तुम्हाला त्वरीत पोलीस किंवा वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता असल्यास किंवा तुमचा ड्रायव्हर नशेत असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया 911 वर कॉल करा. सर्व लोक धोक्यातून बाहेर आले आणि आवश्यक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला की कृपया Uber प्रतिनिधीशी बोलण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

कृपया लक्षात घ्या की ही लाइन फक्त आणि फक्त त्याच वापरकर्त्यांसाठी आहे, ज्यांना सुरक्षिततेशी संबंधित सहाय्य आवश्यक आहे.