पॅकेज डिलिव्हरीबद्दल नेहमीचे प्रश्न

Uber कनेक्ट म्हणजे काय?

Uber कनेक्टद्वारे तुम्ही एखाद्या निश्चित केलेल्या ड्रॉप ऑफ लोकेशनवर वाट पाहत असलेल्या व्यक्तीपर्यंत पॅकेजेस पोहोचवण्याची विनंती ड्रायव्हरला करू शकता.

मी काय पाठवू शकतो?

वाहनाद्वारे डिलिव्हर केल्या जाणाऱ्या पॅकेजेससाठी, तुम्ही अशी लहान किंवा मध्यम पॅकेजेस पाठवू शकता:

  • ज्यांच्यात कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंचा समावेश नाही (खाली प्रतिबंधित वस्तूंची यादी पहा)
  • जी डिलिव्हरीसाठी वजन किंवा मूल्याबाबत असलेले निर्बंध ओलांडत नाहीत
  • जी मध्यम आकाराच्या वाहनाच्या डिकीमध्ये सहजपणे ठेवता येतात
  • जी बंद आहेत, सुरक्षितपणे सीलबंद केली आहेत आणि पिकअपसाठी तयार आहेत

बाइक किंवा स्कूटरद्वारे डिलिव्हर केल्या जाणाऱ्या पॅकेजसाठी, तुम्ही अशी लहान किंवा मध्यम पॅकेजेस पाठवू शकता:

  • ज्यांच्यात कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंचा समावेश नाही (खाली प्रतिबंधित वस्तूंची यादी पहा)
  • ज्यांचे कमाल एकत्रित वजन 15 पाउंड्स आणि कमाल एकत्रित मूल्य $100 आहे
  • जी बॅकपॅकमध्ये सहजपणे ठेवता येतात
  • जी बंद आहेत, सुरक्षितपणे सीलबंद केली आहेत आणि पिकअपसाठी तयार आहेत

प्रतिबंधित वस्तू

तुमच्या कराराद्वारे अन्यथा निर्दिष्ट केले असल्याशिवाय, प्रतिबंधित वस्तूंमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत, परंतु त्या यांच्यापुरत्याच मर्यादित नाहीत:

  • अल्कोहोल
  • प्राणी
  • बंदुका
  • नाजूक वस्तू
  • पैसे/गिफ्ट कार्ड्स/इ.
  • अमली पदार्थ

तुमच्या पॅकेजमध्ये प्रतिबंधित वस्तू असल्यास किंवा त्यामध्ये वरील निर्बंधांचे पालन होत नसल्यास ड्रायव्हर तुमची विनंती रद्द करू शकतो.

डिलिव्हरीची विनंती कशी करावी

डिलिव्हरीची विनंती करण्यासाठी:

  1. Uber ॲपमधील पॅकेज चिन्हावर टॅप करा.
  2. “पॅकेज पाठवा” किंवा “पॅकेज प्राप्त करा” निवडा आणि प्रेषक किंवा प्राप्तकर्त्यांची माहिती लिहा. ही माहिती न विसरता नेहमी लिहा जेणेकरून तुम्ही डिलिव्हरी पिन सक्रिय करू शकाल.
  3. “कनेक्ट निवडा” वर टॅप करा.
  4. पॅकेज मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा आणि “समजले” निवडा.
  5. डिलिव्हरीच्या तपशिलांचा आढावा घ्या, डिलिव्हरी पर्याय निवडा आणि विशेष सूचना जोडा.
  6. तुमच्या डिलिव्हरीच्या विनंतीची पुष्टी करा.

डिलिव्हरीची विनंती केल्यानंतर तुम्ही पिकअप किंवा ड्रॉप ऑफचा पत्ता बदलू शकणार नाही.

डिलिव्हरी पिन हा पॅकेज डिलिव्हर केले गेले याची पुष्टी करण्यात मदत करण्याचा एक मार्ग आहे, परंतु काही वेळा पिन गोळा करणे शक्य नसते. तुम्ही डिलिव्हरी पिन सक्रिय केल्यास, तो तुमच्या ॲपमध्ये दिसून येईल आणि आयटम प्राप्त करणाऱ्या व्यक्तीसोबत शेअर केला जाईल. प्राप्तकर्त्याने डिलिव्हरी पिकअप करण्यासाठी आणि ड्रायव्हरसोबत पिन शेअर करण्यासाठी तयार राहावे.

डिलिव्हरी दरम्यान तुमचे पॅकेज खराब झाले आणि तुम्ही डिलिव्हरी खर्चाचा परतावा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही डिलिव्हरीच्या तारखेनंतर कामकाजाच्या तीन दिवसांच्या आत झालेल्या नुकसानाचे फोटो आणि वर्णन सबमिट करणे आवश्यक आहे.

Uber पॅकेजेससाठी विम्याचे संरक्षण घेत नाही.

कृपया संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटी पहा. नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्यास तुमचे खाते कोणत्याही सूचनेशिवाय निष्क्रिय केले जाऊ शकते.

मी एखाद्या व्यक्तीला सरप्राइझ म्हणून पॅकेज पाठवू शकतो का?

आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही डिलिव्हरीच्या प्राप्तकर्त्याला सूचित करावे जेणेकरून ते वाहनातील पॅकेज मिळवण्यासाठी ड्रायव्हरला पदपथावर भेटू शकतील.

तुम्ही एखाद्याला सरप्राइझ म्हणून पॅकेज पाठवले असल्यास, तुम्ही ड्रायव्हरला, Uber ॲपच्या मेसेज विभागात, पॅकेज प्राप्तकर्त्याच्या दारात ठेवण्याची स्पष्ट सूचना द्यावी लागेल. ड्रायव्हर ही विनंती कधीही नाकारू शकतो.