Using Uber promotions and Uber Credits

Uber प्रमोशन्स

Uber प्रमोशन्समुळे Uber सह ट्रिप्सवर बचत होऊ शकते. व्हाउचर्स आणि गिफ्ट कार्ड्सपेक्षा प्रमोशन्स वेगळे असतात. व्हाउचर्स व्यवसायांकडून दिली जातात आणि (जिथे उपलब्ध असतील तिथे) गिफ्ट कार्ड्स तुमच्या Uber Cash शिलकीमध्ये जोडली जातात.

तुम्ही एखाद्या प्रमोशनसाठी पात्र असल्यास, तुम्हाला ईमेल किंवा Uber ॲप सूचनेद्वारे एक प्रमोशन कोड मिळेल.

प्रमोशन कोड्स पाहण्यासाठी किंवा तुमच्या खात्यात जोडण्यासाठी:

  1. ॲपमध्ये, "खाते" आणि नंतर "वॉलेट" निवडा. तुमच्याकडे ॲपची जुनी आवृत्ती असल्यास, तुम्हाला “वॉलेट” ऐवजी “पेमेंट” दिसू शकेल.
  2. खाली स्क्रोल करून “प्रमोशन्स” वर जा. प्रत्येक प्रमोशन कोडसह त्याची कालबाह्यतेची तारीख आणि विशिष्ट देश किंवा शहर यांसारखी जिथे तो लागू होणार आहे ती क्षेत्रे नमूद असतील.
  3. नवीन प्रोमो कोड जोडण्यासाठी “प्रोमो कोड जोडा” वर टॅप करा.
  4. कोड लिहा आणि “जोडा” वर टॅप करा.

तुमच्याकडे तुमच्या खात्यावर एकाहून अधिक प्रमोशन कोड्स उपलब्ध असल्यास, तुम्ही तुमच्या राईडसाठी त्यापैकी विशिष्ट प्रमोशन लागू करू शकणार नाही. उपलब्ध असलेली कमाल बचत आपोआप लागू होईल.

Uber Cash

तुमच्या खात्यामध्ये Uber Cash ची एक निश्चित रक्कम जोडण्यासाठी:

  1. Uber ॲपमध्ये, "खाते" वर टॅप करा.
  2. “वॉलेट” निवडा. तुमच्याकडे ॲपची जुनी आवृत्ती असल्यास, तुम्हाला “वॉलेट” ऐवजी “पेमेंट” दिसेल.
  3. “Uber Cash” कार्डवर, “निधी जोडा” वर टॅप करा.
  4. तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जोडायची असलेली रक्कम निवडा.
  5. “जोडा” वर टॅप करा.

ऑटोमॅटिक Uber Cash रीफिल्स सेट करण्यासाठी:

  1. Uber ॲपमध्ये, "खाते" वर टॅप करा.
  2. “वॉलेट” निवडा. तुमच्याकडे ॲपची जुनी आवृत्ती असल्यास, तुम्हाला “वॉलेट” ऐवजी “पेमेंट” दिसेल.
  3. “Uber Cash” कार्डवर, “निधी जोडा” वर टॅप करा.
  4. तुमची शिल्लक कमी झाल्यावर तुम्हाला जी रक्कम आपोआप जोडायची असेल ती निवडा आणि नंतर “ऑटो-रीलोड” टॉगल निवडा.
  5. “सेव्ह करा आणि जोडा” वर टॅप करा.

Uber Cash वापरून ट्रिपचे पेमेंट करण्यासाठी:

  1. Uber ॲपमध्ये, “कुठे जायचे?” ह्या फिल्डमध्ये तुमचे अंतिम ठिकाण लिहा.
  2. तुमच्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा.
  3. Uber Cash टॉगल निवडा.
  4. राईडची विनंती करा.

Uber Cash सर्व लोकेशन्सवर उपलब्ध नाही.