Postmates बद्दल नेहमीचे प्रश्न

काय होत आहे आणि का

Postmates अनुभव का अपडेट केला जात आहे?

आता Postmates आणि Uber Eats एकत्र आले असल्यामुळे, आम्ही तुम्हाला अधिक रेस्टॉरंट्स, जलद सेवा आणि अधिक स्मार्ट शिफारसी देण्यासाठी Postmates चा अनुभव अपडेट करत आहोत.

Postmates च्या अनुभवामध्ये काय बदल होत आहेत?

Postmates बद्दल तुम्हाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही कायम ठेवत आहोत, परंतु नवीन रुपात आणि अनुभवासह. शिवाय, तुम्ही रेस्टॉरंट्स, किराणा दुकाने आणि इतर अनेक गोष्टींच्या विस्तृत निवडीचा आनंद घ्याल.

मला हे बदल कधी दिसणे अपेक्षित आहे?

आम्ही पुढील काही महिन्यांत हळूहळू Postmates च्या अनुभवात नवीन अपडेट्स करू.

माझ्याकडे Uber Eats खाते नाही, तुम्हाला असे का वाटते की माझ्याकडे आहे?

तुमची खाते माहिती Uber Eats खात्याशी संबंधित असल्यास, परंतु तुमच्याकडे ते खाते नसल्यास, कृपया त्यात लक्ष घालण्यासाठी Uber Eats सहाय्य टीम शी संपर्क साधा.

सामान्य खाते माहिती

मला Postmates मध्ये माझ्या Uber खात्यासह लॉग इन का करावे लागेल?

Postmates आणि Uber Eats अधिक रेस्टॉरंट्स, जलद सेवा आणि चांगल्या शिफारशींसह तुम्हाला उत्तम सेवा देण्यासाठी एकत्र आले आहेत. या संयुक्त अनुभवाचा आनंद घेण्यासाठी तुमच्या Postmates ॲपद्वारे तुमची Postmates आणि Uber खाती लिंक करा!

मला Uber Eats किंवा Postmates खाते नको असल्यास काय?

Uber कडून वापरकर्त्यांना त्यांची खाती लिंक करण्यास सांगणाऱ्या सूचना मिळतील. तुम्ही तुमचे खाते लिंक करण्याची निवड रद्द करू शकता, परंतु असे केल्याने, तुम्ही Postmates वापरू शकणार नाही. तुम्ही काय अपेक्षा करू शकता आणि खाते लिंकिंगची निवड कशी रद्द करू शकता हे दाखवणाऱ्या सूचना वापरकर्ते प्राप्त करू शकतात.

मला एक त्रुटी मेसेज मिळत आहे: “तुमचे PM खाते Uber शी लिंक केले आहे, सुरू ठेवण्यासाठी...” हे काय आहे?

आयओएस: ॲप स्टोअरवरून तुमचे ॲप अपडेट करा.

अँड्रॉइड: प्लेस्टोअरवर तुमचे ॲप अपडेट करा.

Postmates वर माझ्यासाठी उपलब्ध असलेली सर्व रेस्टॉरंट्स Uber Eats वर उपलब्ध असतील का?

होय, पूर्वी तुमच्यासाठी उपलब्ध असलेले व्यापारी Postmates वर यापुढेदेखील तुमच्यासाठी उपलब्ध राहतील.

अनेक Postmates व्यापारी Uber Eats वरदेखील जातील. यावेळी कोणते व्यापारी उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी कृपया Uber Eats ॲप तपासा. आम्ही नवीन व्यापाऱ्यांना नेहमी साइन अप करत असतो.

मला एका खात्यावर ब्लॉक केले असल्यास, याचा अर्थ मला दुसऱ्या खात्यावर ब्लॉक केले आहे का?

खात्यावरील बंदीचे मूल्यमापन हे त्या त्या प्रकरणाच्या आधारावर केले जाते आणि याचा अर्थ वापरकर्त्याला दरवेळी दोन्ही प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे असा होत नाही.

काही विशिष्ट घटनांमध्ये दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुमच्या खात्याचा ॲक्सेस प्रतिबंधित केला जाऊ शकतो. परंतु, काही परिस्थितींमध्ये असे होणार नाही आणि म्हणून तुमच्या ॲक्सेसची पुष्टी करण्यासाठी तुमच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करण्याची आम्ही नेहमी शिफारस करतो.

मी माझ्या सध्याच्या Postmates खात्यात कसे लॉग इन करू?

तुमच्या Postmates खात्यात लॉग इन करण्यासाठी, तुम्ही ॲप किंवा वेबसाइटमध्ये साइन अप करण्यासाठी वापरलेला फोन नंबर लिहा. तुम्हाला प्रथम तुमचे खाते सध्याच्या Uber खात्याशी लिंक करण्यास सांगितले जाईल किंवा नवीन Uber खाते तयार करण्यासाठी पायऱ्या सांगितल्या जातील.

लिंक केल्यानंतर तुम्ही लॉग इन करण्यासाठी तुमचा Postmates फोन नंबर वापरणे सुरू ठेवू शकता.

मी माझा फोन नंबर बदलला. मी तो Postmates वर अपडेट करू शकतो का? नसल्यास, माझ्या Postmates खात्यात लॉग इन करण्यासाठी मी कोणता फोन नंबर वापरावा?

तुम्ही तुमचे Postmates आणि Uber खाते लिंक केल्यानंतर तुम्ही Postmates वर तुमचा फोन नंबर बदलू शकत नाही. तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी तुमचा जुना Postmates फोन नंबर वापरणे सुरू ठेवावे.

किंवा त्या ऐवजी, तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी लॉगिन स्क्रीनवरील साइन इन करू शकत नाही लिंकवर क्लिक करून तुमचा ईमेल वापरू शकता.

खाती लिंक करणे

माझ्याकडे Uber Eats खाते आहे, मी ते का लिंक करू शकत नाही?

तुमच्या Uber Eats लॉगिन माहितीमध्ये एखादी समस्या असू शकते, जसे की चुकीचा पासवर्ड. कृपया साइन इन करण्यात मदतीसाठी Uber Eats सहाय्य टीमशी संपर्क साधा.

मी माझे खाते लिंक केल्यावर माझा सर्व पेमेंट डेटा, शिलकी, क्रेडिट्स, गिफ्ट कार्ड्स, रोख इ. Uber Eats मध्ये ट्रान्सफर होईल का?

होय, जेव्हा तुम्ही तुमची खाती लिंक करता तेव्हा तुमच्या पेमेंट पद्धती आणि कोणतीही गिफ्ट कार्ड्स किंवा Postmates कॅश ट्रान्सफर होतील. तुमचे सध्याचे Postmates कॅश मूल्य Uber ॲपमध्ये Uber Cash म्हणून उपलब्ध होईल.

मला माझी खाती जोडायची आहेत पण मी तसे करू शकत नाही. का?

आम्ही दररोज अधिकाधिक Postmates ग्राहकांना त्यांचे Postmates खाते त्यांच्या Uber Eats खात्याशी लिंक करण्याची परवानगी देत आहोत. अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या ईमेलवर आणि Postmates ॲपवर लक्ष ठेवा.

मी माझे Postmates ॲप माझ्या Uber ॲपशी लिंक करू शकतो की मला दोन ॲप्स वापरावी लागतील?

आम्ही Postmates ॲपवर रेस्टॉरंटच्या ऑफर्स बदलणार नाही. तुम्ही Postmates ॲप थोड्या बदलांसह वापरणे सुरू ठेवू शकता.

Postmates वरील सर्व रेस्टॉरंट्स Uber Eats वर उपलब्ध आहेत.

माझे Postmates खाते माझ्या Uber खात्याशी लिंक केल्यानंतर मी ते ॲक्सेस करू शकतो का?

तुम्ही तुमची Postmates आणि Uber खाती लिंक केल्यानंतर, तुमचा बराचसा डेटा Postmates ॲपमध्ये उपलब्ध राहील. उदाहरणार्थ, तुम्ही अजूनही पूर्वीच्या ऑर्डर्सचा आढावा घेऊ शकाल आणि अनेकदा तुम्ही यापूर्वी लिहिलेला पेमेंट डेटा ॲक्सेस करू शकता.

गोपनीयता आणि डेटा

Uber Eats द्वारे माझा Postmates डेटा कसा वापरला जाईल?

Uber तुमचा डेटा कसा वापरते याबद्दल अधिक माहिती तुम्हाला गोपनीयता सारांश पृष्ठावर मिळेल.

माझा डेटा Uber सोबत का शेअर केला जात आहे? माझी माहिती सुरक्षित आहे का?

Uber तुमचा डेटा कसा वापरते याबद्दल अधिक माहिती तुम्हाला गोपनीयता सारांश पृष्ठावर मिळेल.

मी Uber Eats ला माझ्या वैयक्तिक डेटाबाबत विनंत्या कशा सबमिट करू शकतो?

गोपनीयता चौकशी सबमिट कराहे पहा.

प्रमोशन्स, क्रेडिट्स, वॉलेट आणि परतावे

याचा अर्थ मी ॲप्समध्ये अदलाबदल करताना प्रमोशन्स, कॅश, क्रेडिट्स इ. लागू करू शकतो का?

प्रोमो कुठे पात्र आहे यावर अवलंबून, प्रमोशन्स एकतर Postmates किंवा Uber Eats साठी मर्यादित असतील. Uber Eats किंवा Postmates यापैकी कशावर प्रोमो वैध आहे, हे स्पष्ट करणाऱ्या सूचना तुम्हाला मिळतील.

Postmates किंवा Uber Eats वर दिलेल्या ऑर्डर्ससाठी कॅश आणि क्रेडिट्सचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही तुमची उपलब्ध शिल्लक तुमच्या Uber Eats वॉलेटमध्ये किंवा Postmates वॉलेटमध्ये पाहू शकता.

Postmates गिफ्ट कार्ड्स Uber Eats वर हस्तांतरित केली जातील. तुम्ही हे गिफ्ट कार्ड Uber Eats किंवा Postmates वर दिलेल्या ऑर्डर्सवर वापरू शकता.

मला माझ्या ऑर्डरसाठी परतावा का मिळू शकत नाही?

Uber सह तुमचे Postmates खाते लिंक करण्यापूर्वी तुम्ही केलेल्या Postmates ऑर्डरच्या परताव्याची विनंती करण्यासाठी:

  1. "ऑर्डर्स" टॅबवर जा आणि संबंधित ऑर्डर निवडा
  2. "मदत" वर क्लिक करा आणि ॲप सूचनांचे पालन करा.

तुम्ही मूळ ऑर्डर Postmates कॅशने दिली असल्यास, तुम्हाला Uber Cash च्या रूपात परतावा दिला जाईल; इतर सर्व पेमेंट पद्धतींसाठी, तुमचा परतावा तुम्ही व्यवहारासाठी मूळात जी पेमेंट पद्धत वापरली होती तिथे जाईल.

आमची धोरणे अलीकडे बदलली असून कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 48 तासांपर्यंत तुम्ही परताव्याची विनंती करू शकता. 48 तासांनंतर, तुम्ही यापुढे परताव्यासाठी पात्र राहणार नाही.

मला माझ्या खात्यावर अतिरिक्त कार्ड्स का दिसतात?

तुमचे Postmates खाते Uber सह लिंक करण्यापूर्वी तुमच्याकडे Uber खाते असल्यास, पूर्वी Uber आणि Postmates मध्ये असलेल्या तुमच्या सर्व पेमेंट पद्धती तुम्हाला दिसतील. तुम्हाला यापुढे Uber किंवा Postmates साठी एखादी पेमेंट पद्धत वापरण्याची इच्छा नसल्यास:

  1. "वॉलेट" वर जा.
  2. त्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा.
  3. "पेमेंट पद्धत काढून टाका" निवडा.

माझ्या Uber वॉलेटमध्ये एक अनोळखी पेमेंट पद्धत का आहे?

तुमच्या पेमेंट पद्धतींच्या तपशीलांचे पुनरावलोकन करण्यासाठी:

  1. "वॉलेट" वर जा.
  2. एक पेमेंट पद्धत निवडणे.

तुम्हाला यापुढे Uber किंवा Postmates साठी एखादी पेमेंट पद्धत वापरण्याची इच्छा नसल्यास:

  1. "वॉलेट" वर जा
  2. त्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा
  3. "पेमेंट पद्धत काढून टाका" निवडा.

माझी मासिक/वार्षिक बचत मला जुन्या Postmates ॲपमध्ये जशी दिसत असे, त्या तुलनेत भिन्न का दिसते?

नवीन ॲपमध्ये, आम्ही फक्त मागील सदस्यता सायकलसाठीच्या बचती ट्रॅक करू. उदाहरणार्थ, जर तुमच्या मासिक पासचे 1 जानेवारी रोजी नूतनीकरण झाले आणि तुम्ही 1 जानेवारी रोजी सकाळी तपासत असाल, तर तुम्हाला कोणतीही बचत दिसणार नाही. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मागील महिन्यातील ऑर्डर्सवर बचत केली नाही. संक्रमणाच्या कालावधीदरम्यान, आम्ही वार्षिक बचत प्रदर्शित करू शकणार नाही.

मी माझ्या Uber वॉलेट मधून एखादी पेमेंट पद्धत कशी काढून टाकू?

तुम्ही "वॉलेट" वर जाऊन आणि पेमेंट पद्धत निवडून तुमच्या पेमेंट पद्धतींच्या तपशीलांचा आढावा घेऊ शकता. तुम्हाला यापुढे Uber किंवा Postmates साठी एखादी पेमेंट पद्धत वापरण्याची इच्छा नसल्यास:

  1. "वॉलेट" वर जा
  2. त्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा
  3. "पेमेंट पद्धत काढून टाका" निवडा.

माझ्या Postmates कॅश शिल्लकीचे काय होते?

Postmates कॅश ही Uber वॉलेटमध्ये Uber Cash म्हणून उपलब्ध आहे आणि तुमची सध्याची शिल्लक Uber Cash मध्ये रूपांतरित केली गेली आहे.

ही शिल्लक आणि तुमचे नुकतेच झालेले Uber Cash व्यवहार पाहण्यासाठी:

  1. ॲप मेनूमधून "वॉलेट" टॅबवर जा
  2. Uber Cash कार्डवर टॅप करा.

तुम्ही तुमच्या ब्राउझरमधून wallet.uber.com वर नॅव्हिगेट करून वॉलेटवर जाऊ शकता.

मला माझ्या Uber वॉलेटमध्ये Postmates कॅश किंवा गिफ्ट कार्ड शिल्लक दिसत नाही. मी काय केले पाहिजे?

  1. अलीकडच्या एखाद्या ऑर्डरसाठी शिल्लक वापरली गेली आहे का ते तपासा.
  2. ॲप मेनूमधून "वॉलेट" वर जा आणि Uber Cash कार्डवर टॅप करा (हे तुम्हाला तुमच्या अलीकडील Uber Cash व्यवहारांच्या इतिहासावर घेऊन जाईल.)
  3. शिल्लक अलीकडच्या एखाद्या ऑर्डरसाठी वापरली गेली आहे का ते तपासा.

अलीकडच्या एखाद्या ऑर्डरसाठी शिल्लक वापरली नसल्यास, कृपया Uber Eats ग्राहक सहाय्य यावर संपर्क साधा.

मी माझे Postmates गिफ्ट कार्ड कोठे रिडीम करू?

तुमच्याकडे रिडीम न केलेले Postmates गिफ्ट कार्ड असल्यास, तुम्हाला त्याच रकमेचा नवीन गिफ्ट कार्ड कोड (ईमेलद्वारे) पुन्हा जारी केला जाईल, जो थेट Uber वर रिडीम केला जाऊ शकतो. तुमचा जुना Postmates गिफ्ट कार्ड कोड निष्क्रिय केला जाईल.

Postmates अनलिमिटेड

माझ्या Postmates अनलिमिटेड सबस्क्रिप्शनचे काय होईल?

तुम्ही विद्यमान सदस्य असल्यास, तुमच्या Postmates अनलिमिटेड सबस्क्रिप्शनमध्ये फारसा बदल घडणार नाही. आता तुम्हाला प्रत्येक ऑर्डरवर 5% सवलतीची हमी असेल.

माझ्याकडे Postmates अनलिमिटेड आणि Eats/Uber पास दोन्ही आहेत. त्यांचे एकत्रीकरण होईल का?

तुमच्याकडे अनलिमिटेड आणि Eats पास दोन्ही असल्यास, आम्ही तुमचा Eats Pass रद्द करू आणि तुमची अनलिमिटेड सदस्यता कायम ठेवू. हे मोफत Eats पास मिळणाऱ्या ॲमेक्स कार्डधारक वगळता, सर्व प्रकरणांसाठी बरोबर आहे. त्यांच्यासाठी, आम्ही अनलिमिटेड सदस्यता रद्द करू.

माझे Postmates अनलिमिटेड सबस्क्रिप्शन हस्तांतरित झाले नाही किंवा माझ्या अनलिमिटेड सबस्क्रिप्शनची मुदत माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर संपत असल्याची दिसते. का?

हे शक्य आहे की सायकलच्या शेवटी तुमची पेमेंट अधिकृतता संपली आहे/संपणार आहे. तुमच्या अनलिमिटेड लाभांचा आनंद घेत राहण्यासाठी कृपया नवीन ॲपमध्ये पेमेंट पुन्हा अधिकृत करा.

मी एक नवीन सदस्य आहे किंवा माझ्या अनलिमिटेड सबस्क्रिप्शनची मुदत संपली आहे आणि नवीन लाभ माझ्या आधी असलेल्या लाभांपेक्षा वेगळे दिसत आहेत. का?

आम्ही सध्याचे Postmates लाभ केवळ सध्याच्या सदस्यांसाठी ऑफर करत आहोत. नवीन सदस्यांना अपडेट केलेले लाभ मिळतील.

सध्याचा Postmates अनलिमिटेड सदस्य म्हणून, मला आहेत तेच लाभ मिळत राहतील का?

आम्ही सध्याचे Postmates लाभ केवळ सध्याच्या सदस्यांसाठी ऑफर करत आहोत. नवीन सदस्यांना अपडेट केलेले लाभ मिळतील.

मी Postmates अनलिमिटेड सदस्य असल्यास, Postmates आणि Uber Eats या दोन्हींवरून ऑर्डर करताना माझे लाभ आता लागू होतील का?

होय, तुमचे लाभ दोन्ही सेवांवर लागू होतात.