Uber येथे, तुमच्या विश्वासाची आम्ही कदर करतो आणि आम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात कशी मदत करतो हे आम्हाला शेअर करायचे आहे.
ड्रायव्हर्सना हे कधीही दिसत नाही:
बहुतेक मार्केट्समध्ये ड्रायव्हर्सना ट्रिप स्वीकारण्यापूर्वी तुमचे पिकअप लोकेशन केवळ अंदाजे दिसते. तुमची ट्रिप संपल्यानंतर, पत्त्याचा तपशील काढून टाकला जातो आणि ड्रायव्हर्सना फक्त तुमच्या पिकअपचे आणि ड्रॉप ऑफचे अंदाजे लोकेशन दिसते.
ड्रायव्हर्सना दाखवण्यात येणाऱ्या अंदाजे पिकअप आणि ड्रॉपऑफ लोकेशनचा प्रकार तुमच्या मार्केटमधील पत्त्याचे स्वरूप, स्थानिक नियम आणि ड्रायव्हर लॉयल्टी कार्यक्रम यांच्या आधारे बदलतो. अंदाजे लोकेशन फॉरमॅट्सची काही उदाहरणे: चौक, रस्त्याचे नाव, लोकप्रिय खूण आणि विशेष फॉरमॅट्स जसे की एयरपोर्ट पिकअप असल्यास तुम्ही जिथे भेटायला पाहिजे ते टर्मिनल आणि दरवाजा क्रमांक.
Uber ॲप वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या लोकेशन सेवा सुरू करण्याची आवश्यकता नाही. तरीही, विश्वसनीय संपर्कांसह तुमच्या राईडची माहिती शेअर करण्यासारख्या काही वैशिष्ट्यांना काम करण्यासाठी लोकेशन माहिती आवश्यक असते.
तुम्ही लोकेशन सेवा वापरत नसल्यास, तुम्ही ॲपमध्ये तुमचे पिकअप आणि ड्रॉपऑफ लोकेशन स्वत: लिहूनसुद्धा Uber वापरू शकता. तुम्ही पत्त्याऐवजी चौक किंवा महत्त्वाच्या खुणादेखील वापरू शकता.
तुम्ही तुमच्या Uber ॲपच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये लोकेशन सेवा वापरायच्या की नाही ते निवडू शकता.
तुमचे डिव्हाइस Uber सह तुमचे स्थान शेअर करण्यासाठी सेट केले असल्यास, तुम्ही तुमच्या ड्रायव्हरसह तुमचे लाइव्ह पिकअप लोकेशन शेअर करणे देखील निवडू शकता. जेव्हा लाइव्ह लोकेशन शेअरिंग चालू असते, तेव्हा तुमचे ड्रायव्हर तुमच्या पिकअप लोकेशनच्या जवळ असतील आणि ETA 3 मिनिटांपेक्षा कमी असेल तेव्हाच तुमचे स्थान त्यांच्यासोबत शेअर केले जाईल.
हे वैशिष्ट्य बाय डिफॉल्ट चालू असते, परंतु पिकअप दरम्यान तुम्ही हे वैशिष्ट्य कधीही थांबवू किंवा बंद करू शकता. तुम्ही तुमच्या सेटिंग्जमध्ये हे वैशिष्ट्य चालू आणि बंद देखील करू शकता.
तुम्ही तुमच्या खाते माहितीचा ऑनलाइन सारांश एक्सप्लोर करू शकता, ज्यात खालील बाबी समाविष्ट असू शकतात:
तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुमच्या डेटाच्या प्रतीची विनंती देखील करू शकता.
तुमचे Uber खाते हटवल्याने तुमचा डेटा Uber च्या सिस्टिमवरून हटवला जातो. मात्र, खाते हटवल्यानंतर कायद्याच्या आवश्यकतेनुसार किंवा परवानगीनुसार Uber काही माहिती राखून ठेवू शकते.